यावल ( प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयास मागील अनेक दिवसांनी विविध समस्यांनी ग्रासले असून या समस्यांचे निराकरण व्हावे, अशा मागण्यांची लेखी तक्रार यावल ग्रामीण रुग्णालय प्रशासनासच्या वतीने आमदार हरीभाऊ जावळे आणी जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात यावल ग्रामीण रूग्णालय प्रशासनाच्या वतीने आमदार हरीभाऊ जावळे आणी जिल्हा शल्य चिकीत्सक यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या कर्मचारी आणी वैद्यकीय अधिकारी यांच्या राहण्यासाठी निवास्थान नसल्याने आरोग्य सेवा देणाऱ्यांची या प्रश्नामुळे मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. यासाठी यावल येथील मंडळ अधिकारी यांनी वैद्यकीय कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधण्याकरीता जागा उपलब्ध करून द्यावी ,अशी मागणी केली करण्यात आली आहे. त्याचबरोबर रुग्णालयाच्या आवारात असलेली पाईपलाईन डॅमेज झाल्याने मुख्य पाईपलाईन चोकप झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात दुर्गंधीयुक्त घाणी साम्राज्य पसरले असून रुग्णांचे आणि आरोग्य कर्मचारी यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. सध्या उन्हाळा असल्याने रूग्णालयाच्या आवारातील कुपनलीकेतिल पाण्याची पाण्याची पातळी खालवली असून वापरासाठी मिळणारा जलसाठा अत्यल्प झाल्याने व रुग्णालयातील शौचालय आणी बाथरूमला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ठीकठीकाणी लिक झाल्याने पाण्याची मोठया प्रमाणावर गळती होत आहे. पाण्याची कमतरता भासु लागली असल्याचे तक्रारी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष सांगोळे यांनी म्हटले आहे.
यावल ग्रामीण रुग्णालयातील वैधकीय अधिकारी अभावी रुग्ण उपचार सेवेवर मोठा परिणाम झाला असुन, ग्रामीण रूग्णालयात गेली अनेक दिवसा पासुन प्रथम श्रेणीचे वैद्यकीय अधिक्षक पद एक,वैद्यकीय अधिकारी रिक्त पदे तिन या सर्व अती महत्वाची पदे रिक्त असल्याने रुग्णांची आरोग्य सेवा ही राम भरोसे झाली आहे. या संदर्भात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंदकांत पाटील यांना पत्रकारांनी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या व अडचणी बाबत प्रश्न विचारले असता निवडणुक आचार सहींता संल्यावर आपण या प्रश्नाकडे लक्ष देवु असे त्यांनी पत्रकारांना प्रश्नांचे उत्तर देतांना सांगीतले होते. आता निवडणुक अंचारससंहिता संपली असुन पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी यावल ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या सोडव्यात अशी अपेक्षा व प्रतिक्षा यावल व परिसरातील नागरीकाकडुन व्यक्त होत आहे.