बारावीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

Students Result

 

पुणे (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी निकाल जाहीर झाला असून यंदा बारावी बोर्डाचा ८५.८८ टक्के इतका निकाल लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजेपासून सर्व निकाल पाहता येणार आहेत.

 

यंदा राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यात विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख ६९ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी त्यापाठोपाठ कला शाखेतून ४ लाख ८२ हजार ३७२ तर वाणिज्य शाखेतील ३ लाख ८१ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ५८ हजार १२ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले. राज्य मंडळाच्या मुंबई विभागातून सर्वाधिक ३ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तर सर्वात कमी ३२ हजार ३६२ विद्यार्थी कोकण विभागातून परीक्षेला प्रविष्ठ झाले आहेत.

 

दरम्यान, निकालाच्या बाबतीत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 90.25 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 82.40 टक्के आहे. यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 7.85 टक्क्यांनी जास्त आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे फेब्रुवारी महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. यात कोकण विभागाचा सर्वाधिक 93.23 टक्के निकाल लागला आहे. तर 82.81 टक्क्यांसह नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. संपूर्ण राज्यात 4470 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. मुंबईच्या सोफिया काॅलेजची विद्यार्थिनी निशीका ही iPad वर परीक्षा देणारी पहिलीच दिव्यांग विद्यार्थिनी ठरली होती. ती 73 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहे.

विभागनिहाय निकाल

– औरंगाबाद 87.29%
– नाशिक 84.77%
– लातूर 86.08%
– अमरावती 87.55%
– मुंबई 83.85%
– पुणे 87.88%
– नागपूर 82.51%
– कोल्हापूर 87.1%
– कोकण 93.23%

 

विविध शाखांचा निकाल 

 

विज्ञान शाखा निकाल :92.60टक्के

कला शाखा निकाल :76.45 टक्के

वाणिज्य शाखा निकाल :88.28टक्के

Add Comment

Protected Content