Home राज्य यूपीएस मदान राज्याचे नवीन मुख्य सचिव

यूपीएस मदान राज्याचे नवीन मुख्य सचिव


मुंबई (वृत्तसंस्था) डी के जैन यांची लोकपाल सदस्यपदी नियुक्ती झाल्याने मुख्य सचिव पदाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे आज यूपीएस मदान यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे. यूपीएस मदान पुढील सहा महिने मदान मुख्य सचिवपदी राहतील, कारण सप्टेंबर महिन्यात ते सेवा निवृत्त होणार आहेत.

सेवा ज्येष्ठतेनुसार यूपीएस मदान यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे. मदान हे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यूपीएस मदान हे याआधी वित्त विभागाचे सचिव होते. डी. के. जैन 31 जानेवारी रोजी निवृत्त होणार होते, मात्र त्यांना ६ महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. पिनाकी घोष यांची लोकपालपदी नियुक्ती झाल्यानंतर लोकपालचे सदस्य म्हणून डी. के. जैन यांची निवड झाली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound