नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च शनिवार रोजी आदर्श आचारसंहितेची घोषणा करून निवडणूकीच्या तारखा घोषित केल्या. देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जूनला जनतेचा कौल देशासमोर येईल. ही लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी. याकरिता निवडणूक आयोगाने अनेक ॲप्पस् तयार केल आहे. त्यातीलच एक cVIGIL ॲप्प महत्वाचे मानले जात आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी हे ॲप्प काम करणार आहे.
सदरील ॲप्प ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यादा वापरले गेले होते. तेव्हापासून आतापर्यंत आणि नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ मध्ये झारखंड विधानसभा निवडणुकीपर्यंत cVIGIL च्या माध्यमातून १ लाख ७१ हजार ७४५ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये १ लाख २७ हजार ५६७ म्हणजेच ७४ टक्के तक्रारी खऱ्या आढळून आल्या होत्या
कुणीही सामान्य माणसाने एखादं बेकायदेशीर कृत्य बघितलं, जसं की एखाद्या उमेदवाराच्या वतीने पैसे वाटले जात आहेत किंवा काही वस्तू वाटल्या जात आहेत, अशावेळी तो व्यक्ती ॲप्पवरुन तक्रार दाखल करु शकतो. तक्रार टेक्स्ट मेसेजवरुन दाखल करता येणार आहे. पुरावा म्हणून फोटो, व्हिडीओ अपलोड करता येणार आहे. माहिती मिळताच निवडणूक आयोगाची टीम १०० मिनिटांच्या आत लोकेशन ट्रेस करुन त्या जागेवर पोहोचेल. ही माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.