जळगाव प्रतिनिधी । नूतन वर्षानिमित्त गोदावरी फाऊंडेशनतर्फे आरोग्यविषयक गोदावरी दिनदर्शिका २०२२ चे वैद्यकीय महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते थाटात अनावरण करण्यात आले.
गोदावरी फाऊंडेशनतर्फे नवीन वर्षाच्या या आरोग्यविषयक दिनदर्शिकेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील प्रत्येक विभागाची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे. तसेच विविध आजारांवरील उपचार, शस्त्रक्रिया, तपासण्या याविषयीच्या माहितीचा समावेश करण्यात आला असून गरजू रुग्ण आणि नागरिकांना संपर्क साधण्यासाठी संबंधित विभागाचे डॉक्टर्स, आरोग्य मित्र यांच्या नावासह मोबाइल क्रमांक देखील नमूद करण्यात आले आहे. तसेच रुग्णालयात लागू असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती देखील यात देण्यात आली आहे. अशा या आरोग्यविषयक महिला खजिना असलेल्या दिनदर्शिकेचे मोठ्या थाटात अनावरण करण्यात आले.
गोदावरी दिनदर्शिका २०२२ चे अनावरण करताना गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा. डॉ.उल्हास पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.ऐन.एस.आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, हृदयविकार तज्ज्ञ डॉ.वैभव पाटील, नर्सिंगचे डायरेक्टर शिवानंद बिरादार, मेट्रन संकेत पाटील, कीर्ती पाटील, निर्भय पाटील, प्रिंटिंग विभाग प्रमुख राहुल पाटील, मार्केटिंगचे रत्नशेखर जैन, मीडिया विभागातील सहाय्यक जनसंपर्क अधिकारी गौरी जोशी, सोशल मीडिया प्रमुख गणेश महाजन , दीपक पाटील, दीक्षा सुरे आदी उपस्थित होते.