Home क्राईम सख्ख्या शालकानेच केला ‘गेम’ : निखील राजपूतचा मारेकरी अटकेत !

सख्ख्या शालकानेच केला ‘गेम’ : निखील राजपूतचा मारेकरी अटकेत !

0
95


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची आज पहाटेच्या सुमारास करण्यात आलेली क्रूर हत्या ही दुसरी-तिसरी कुणी नव्हे तर त्याच्या सख्ख्या शालकानेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, भुसावळसह परिसर आज पहाटे तीन खुनांच्या बातम्यांनी प्रचंड हादरला. यात कंडारी येथे दोन सख्खे भाऊ हे प्राणघातक हल्ल्यात मरण पावले. तर दुसरीकडे काही तासांमध्येच बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत कुख्यात गुन्हेगार निखील राजपूत याची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली.

भुसावळसह परिसरातील गुन्हेगारीच्या क्षेत्रात गेल्या दोन-तीन वर्षात निखील राजपूतची प्रचंड दहशत पसरली होती. खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, खंडणी, धमक्या अशा अनेक प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र तो अगदी पोलिसांना देखील जुमानत नव्हता.

हे देखील वाचा : कुख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा खून

दरम्यान, काल रात्री तो चमेली नगरातील आपल्या राहत्या घराजवळ पाण्याच्या टाकीच्या वरील भागास आपल्या सहकार्‍यांसह झोपला होता. याप्रसंगी निखील राजपूतवर धारदार शस्त्राने वार झाल्याने यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मारेकर वार करून घटनास्थळावरून तात्काळ फरार झाला.

दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता मारेकरी हा निखील राजपूतच्या चांगल्या परिचयाचा व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. निखील हा पाण्याच्या टाकीवर झोपत असल्याची माहिती त्याला असल्याने त्याने टाकीवर चढून निखीलवर वार केले. याप्रसंगी निखीलसोबत काही जण देखील होते. मात्र त्यांना काही कळण्याच्या आतच मारेकर्‍याने पलायन केले. पोलिसांनी तपास केला असता सदर आरोपी हा निलेश चंद्रकांत ठाकूर ( वय २२, रा. कंडारी, ता. भुसावळ ) असल्याची माहिती मिळाली. त्याला बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली.

हे देखील वाचा : एकाच रात्री तीन खुनांनी हादरले भुसावळ

यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निखील राजपूतचा खून करणारा आरोपी हा त्याचाच शालक अर्थात पत्नीचा भाऊ असल्याची माहिती समोर आली. निखीलने आधी आपल्या समाजातील तरूणीशी विवाह केला होता. तिला घटस्फोट दिल्यानंतर त्याने आंतरजातीय विवाह केला होता. यानंतर तो आपल्या पत्नीला खूप त्रास देत असे. त्याचे काही महिलांशी विवाहबाह्य संबंध देखील होते. यातून अनेकदा वाद देखील झाले होते. याच वादातून शालकाने थेट आपल्या मेहुण्याचाच गेम केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


Protected Content

Play sound