Home Cities चोपडा चोपडा येथील जनआक्रोश मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद

चोपडा येथील जनआक्रोश मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद


morcha

चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील वैजापूर येथे घड़लेल्या अमानवीय घटनेचा निषेध नोंदवून यातील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी काल (दि.१६) रोजी शहरात अभूतपूर्व असा सर्व पक्षीय सर्व जाती-धर्माचा संयुक्तिक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.

 

या मोर्चात माझ्या आदिवासी मुलींच्या पाठीशी हजारोंच्या संख्येने खंबीरपणे उभे राहून आपण जी साथ दिलीत. शहर व तालुक्यातील सर्वच सामाजिक संस्था ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, माझे सारे आदिवासी बांधव, भगिनी ज्यांनी सामाजिक भान ठेवत उपस्थिती दिली. त्याबद्दल आदिवासी म्हणून समाजाच्या वतीने आपणा साऱ्यांचे मी नतमस्तक होऊन आभार मानतो. तसेच मोर्चाच्या बंदोबस्ता साठी हजर सारे पोलिस दल, कर्मचारी, अधिकारी, तहसीलदार, महसूल अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांचेही आभार मानत सदैव आपल्या ऋणात राहु इच्छितो, अशा शब्दात चोपडा तालुक्याचे माजी आ. जगदीश वळवी यांनी आज (दि.१७) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


Protected Content

Play sound