भारत व भूतानमध्ये मैत्रीचा नवीन अध्याय-मोदी

थिंपू वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुसर्‍यांना भूतानच्या दौर्‍यावर दाखल झाले असून यात या दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे नवीन पर्व सुरू होणार असल्याचा आशावाद पंतप्रधानांची व्यक्त केला.

आज राजधानी थिंपू येथील पारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रूपे कार्ड आणि जलविद्युत प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग यांचे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. पंतप्रधानपदाच्या दुसर्‍या कार्यकाळाच्या सुरुवातीला मला भूतानला येण्याची संधी मिळाली. हे माझ्यासाठी भाग्यच आहे. भूतान हे आपले शेजारी आहे, व हे आमच्यासाठी भाग्यच आहे. दोन्ही देश एकत्र मिळून पुढे जात आहेत, असे मोदींनी म्हटले आहे. या दौर्‍यातून भारत आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे नवीन पर्व सुरू होणार असल्याचा आशावादही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.

Protected Content