Home Cities जळगाव उन्मेष पाटलांना दणदणीत मताधिक्य मिळणार- सुरेशदादा जैन

उन्मेष पाटलांना दणदणीत मताधिक्य मिळणार- सुरेशदादा जैन

0
86

जळगाव प्रतिनिधी । आमदार उन्मेषदादा पाटील यांना जळगावमधून दणदणीत मताधिक्य मिळून ते विजयी व्हावे म्हणून आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही सुरेशदादा जैन यांनी दिली. ते ७, शिवाजीनगर या आपल्या निवासस्थानी आयोजित बैठकीत बोलत होते.

माजी मंत्री सुरेश दादा जैन यांच्या निवासस्थानी युतीच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील, आमदार राजुमामा भोळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सुरेशदादा जैन यांनी आपण उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी हिरीरीने फिरणार असून त्यांना विजयी करण्यासाठी झटणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, शहरात उद्योगांना व विकासाला चालना मिळण्याकरिता सुरक्षेच्या दृष्टीने जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील यांना लाखाचा लीड देण्याकरिता सर्व सामान्य नागरिक व जनतेला विनंती करणार आहोत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देशाचे नेतृत्व गरजेचे आहे, देशात अराजकता असता पंतप्रधान मोदी यांनी देश एकसंघ बांधून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले, ज्या देश भक्तांनी घर, परिवार त्यागून नवा अध्याय रचला आहे, देशाला समर्पित देशभक्त नरेंद्र मोदींच्या पाठशी जनतेने उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी केले आहे. दरम्यान, उद्या उन्मेष पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार असून शहरातून प्रचारफेरी निघणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound