नुकसानग्रस्त शाळेची खा. उन्मेष पाटील यांनी केली पाहणी

kanashi school

चाळीसगाव प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कनाशी येथील शाळेचे वादळात नुकसान झाले असून आज या शाळेची पाहणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली.

भडगाव तालुक्यातील कनाशी येथील १९१८ पासून सुरू असलेल्या प्राथमिक विद्यामंदिर शाळेची कालच्या वादळवार्‍यात दुरवस्था झाली आहे. शाळेच्या पाच खोल्यांपैकी एका खोलीचे पत्रे उडाली असून एका खोलीचे कौल पडल्याने या दोन्ही वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना बसता येणार नाही अशी अवस्था झाली आहे. या अनुषंगाने आज खासदार उन्मेष पाटील यांनी या शाळेला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

याप्रसंगी तहसीलदार गणेश मरकड, शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटील, तालुका कृषी अधिकारी पी,डी गोरडे, मुख्याध्यापक सचिन पाटील, व्याख्याते प्रदीप देसले, उपसरपंच सचिन पाटील, समाधान पाटील, हर्षल पाटील,भाऊसाहेब पाटील, प्रदीप पाटील, गणेश पाटील, अशोक पाटील, किरण पाटील, दत्तात्रय पाटील,शरद पाटील, उमेश पाटील, शिवाजी पाटील ,आदेश पाटील ,संदीप पाटील, हर्षल पुजारी, सचिन साळकर ,मधुकर मोरे, प्रदीप भोसले, बापू कुमावत यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

खासदार उन्मेष पाटील यांनी तातडीने या प्रसंगी उपस्थित शिक्षण विस्तार अधिकारी यांना शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करा व प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी यांचेकडे पाठवा पुढील कारवाईसाठी आपण त्यांच्याशी संपर्क करणार असल्याचे ते म्हणाले. येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले. यावेळी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content