Home Cities अमळनेर खासदार उन्मेष पाटलांनी घेतली डॉ. बी.एस. पाटील यांची भेट

खासदार उन्मेष पाटलांनी घेतली डॉ. बी.एस. पाटील यांची भेट

0
31

unmesh patil b s patil meeting

अमळनेर प्रतिनिधी । खासदार उन्मेष पाटील यांनी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांची आज भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी खासदार ए.टी. पाटील यांचे जाहीर समर्थन केले होते. त्यांनी नानांचे तिकिट कापल्यावरून नाराजी व्यक्त केली होती. या अनुषंगाने केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा गहजब उडाला होता. यानंतर अमळनेर येथील पक्षाच्या मेळाव्यात उदय वाघ आणि त्यांच्या समर्थकांनी डॉ. बी.एस. पाटील यांना हाणामारी केली होती. हे प्रकरण अवघ्या देशभरात गाजले होते. यानंतर डॉ. पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात फारसे दिसले नाही. या पार्श्‍वभूमिवर, आज खासदार उन्मेष पाटील यांनी अमळनेर येथील दौर्‍यात डॉ. बी.एस. पाटील यांची भेट घेतली.

उन्मेष पाटील यांनी खासदार झाल्यानंतर बेरजेचे राजकारण सुरू केल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने त्यांनी आज डॉ. बी.एस. पाटील यांची भेट घेतल्याचे मानले जात आहे. यामुळे भाजपमधील कटूता लवकर मिटू शकते. दरम्यान, खासदार उन्मेषदादांनी बी.एस. पाटील यांची घेतलेली भेट ही राजकीय वर्तुळात कुतुहलाचा विषय बनली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound