दिनदुबळ्यांसह गरजवंतांना मदत करा – डॉ. वाजीद अली खान

shantata baithak

रावेर प्रतिनिधी। दिनदुबाळ्याची मदत करा दिव्य कुराणाचा अभ्यास करून प्रेषित मोहम्मद पैगंम्बरचे आचार विचार आत्मसात करा, तुमचा जीवन तुम्हा सर्वांसाठी परिक्षारूपी आहे, तूम्ही सर्वांसी बंधू भाव व एकोपा प्रेमाने राहा, असे प्रतिपादन जमाते इस्लामीचे औरंगाबाद येथील डॉ. वाजीद अली खान यांनी केले.

रावेर पोलीस, जमाते इस्लामी व शांतता समिती तर्फे आयोजित रमजान महिन्यानिमित्त शनिवारी आयोजित सामूहिक रोजा इफ्तार कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. वाजीद अली खान यांनी रोजा सोडण्यापूर्वी दिव्य कुराण व तयाचे महत्व सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले हे होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
माजी आमदार शिरीष चौधरी, उपअधीक्षक रोहित मतांनी, प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार उसाराणी देवगुणे, फैजपूर भागविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, अनिल चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्षक पद्माकर महाजन, सुरेश धनके, राजू महाजन, नगरसेवक आसिफ मोहम्मद, सादिक शेख, असद खान, जगदीश घेटे, अय्युब पठाण, ॲड. एम.ए. खान, ग्यास शेख, युसुफ खान, दिलीप कांबळे, बाळू शिरतुरे, राजे रघुनाथ वाचनालयचे ग्रंथ पाल, शीतल पाटील, म्हेमुद मण्यार मन्सूर मण्यार, पोलीस पाटील लोहार कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शफीयोद्दीन शेख यांनी केले तर आभार सरफराज खान यांनी मानले.

Add Comment

Protected Content