Home Cities पाचोरा पाचोरा तालुक्यात उन्मेष पाटील यांचा प्रचार

पाचोरा तालुक्यात उन्मेष पाटील यांचा प्रचार

0
29

पाचोरा प्रतिनिधी । भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) महायुतीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उन्मेष पाटील यांनी आज पाचोरा तालुक्यात प्रचार केला.

आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचार दौर्‍याला लोहटार येथून सुरुवात झाली. यात पदाधिकारी आणि कार्यर्त्यांसह ग्रामस्थदेखील सहभागी झाले होते. लोहटार, राणीचे बांबरुड, लासगाव, सामनेर, नांद्रे, माहेजी, कुरंगी येथील रॅली मध्ये गावकरी सहभागी ग्रामीण भागातील प्रचार दौर्‍यात जोरदार प्रचार रॅली निघाली.

या प्रचार फेरीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, भाजप ज्येष्ठ नेते सदाशिव आबा पाटील, जळगाव महानगर सचिव दीपक सुर्यवंशी, डी. एम. पाटील,जिल्हा परिषदेचे सदस्य पद्मसिंह पाटील, जि.प.सदस्य मधुकर काटे, युवा नेते अमोल शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शहरप्रमुख नंदू सोमवंशी , शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, दादू वकील साहेब, माजी सभापती अनिल पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद पाटील,पंढरी पाटील, गोविंद शेलार, वैभव पाटील, तालुका विस्तारक विकिभाऊ देशमुख,माजी सभापती राजेंद्र पाटील, रवींद्र देशमुख , किशोर आढाव वैभव टेमकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष साधनाताई देशमुख, सुनील काटे, राजू तायडे, माजी सरपंच सुनील पाटील, राजू पाटील अमोल महाले जीतू पाटील राजू भैय्या पाटील, दादा पाटील, तुकाराम मिस्त्री, सुनील पाटील, धनराज भोई,समाधान भोई,सलीम शेख,सुनील पाटील, युवा सेनेचे जीतू पाटील. तुळशीराम गवळी गोपाल महाजन शिवसेनेचेे रामू पाटील, महेश येथील सारंग पाटील सुनील पाटील विनोद पाटील नांद्रे संदीप खैरनार प्रवीण तावडे नरेंद्र भोई,राजमल बाविस्कर, युवराज काटे सुभाष गावडे शिवाजीराव तावडे तुकाराम मिस्तरी आदी सहभागी झाले होते. यासोबत गट प्रमुख, गण प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य , सोसायटी चेअरमन ,संचालक नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी व तालुक्यातील तालुका व जिल्हा युवामोर्चा, महीला आघाडी, सर्व पदाधिकारी तसेच आपले मित्र पक्ष शिवसेना, रिपाइं (आठवले गट), रासप, शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी यांनी उन्मेशदादांच्या पाठिंब्यासाठी दौर्‍यात सामील झाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound