नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अविवाहित महिलेसही गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
एमटीपी कायद्यांच्या अंतर्गत अविवाहित महिलांनाही गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतातील गर्भपात कायद्यानुसार विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेद नाही. अविवाहित महिला २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करू शकते असे न्यायालयाने म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने विवाहित आणि अविवाहित महिलांच्या गर्भपाताचा अधिकार काढून टाकताना म्हटले आहे की, अविवाहित महिलांना लिव्ह-इन रिलेशनशिपमधून वगळण्यासाठी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमटीपी) कायदा असंवैधानिक आहे असंही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.