यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील वनविभागाच्या वतीने चार चाकी वाहनाने विनापरवाना लाकुडतोडून तिची वाहतूक करणारे वाहनावर कारवाई केली आहे. जवळपास २ लाखांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे.
याबाबत अधिक असे की, बुधवार १० एप्रील रोजी विवरे ते रावेर रस्त्याने वनविभागाचे पथक शासकीय वाहनाने गस्त करीत असताना ट्रक क्रमांक (एमएच १९ झेड ७८६२) मध्ये विनापरवाना लाकूड भरलेले दिसले. वाहनचालकाकडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. वन गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशी साठी ताब्यात घेऊन शासकीय आगार रावेर येथे आणून जमा केला. निम (पंचरास) जळावू लाकूड घन मीटर १५.०० व ट्रक क्रमांक एमएच १९ झेड ७८६२जप्त करण्यात आले आहे. या गुन्हे प्रकरणी वनपरीक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२) ब, ४२,५ २ अन्वये. गुन्हा नोंदविला आहे.
या कार्यवाहीत आनंदा पाटील, वनपरीक्षेत्र अधिकारी संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल,रमेश थोरात वनपाल, सचिन तडवी पो.कॉ. आनंद तेली,वाहन चालक यांनी सहभाग घेतला. सदर कार्यवाही ही श्रीमती नीनू सोमराज वनसंरक्षक धुळे (प्रा.), जमीर शेख,उप वनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव , राजेंद्र सदगीर विभागीय वनाधिकारी दक्षता पथक धुळे,प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल, यांचे मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन यावल यांनी व त्यांचे पथकातील कर्मचाऱ्यांनी यांनी केली.