राष्ट्रीय एकात्मता शिबीरासाठी विद्यापीठ संघ जमशेदपूरला रवाना

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय एकात्मता शिबीर दि.१८ ते २४ मे या कालावधीत आरका जैन विद्यापीठ, जमशेदपूर(टाटानगर), झारखंड येथे होत आहे. या शिबीरात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ६ पुरूष व ६ महिला स्वयंसेवक व एक पुरूष कार्यक्रम अधिकारी असे एकूण १३ व्यक्तींचा संघ सहभागी झाला असून संघ जमशेदपूरकडे रवाना झाला.

युवक कार्य व क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सहमतीने प्रादेशिक संचालनालय, पटना व आरका जैन विद्यापीठ, जमशेदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाची निवड करण्यात आली आहे.

संघात घोगडे महेंद्र (अ.र.भा. गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी), यश पाटील (किसान महाविद्यालय, पारोळा), दिनेश रोकडे (क.वा.वि.महाविद्यालय,धरणगाव),सुप्रिम पाटील (पी.जे.एन. समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर), दिलीप बाचकर (सि.गो.पाटील महाविद्यालय, साक्री), पवन निकुम (आ.मा.पाटील महाविद्यालय,पिंपळनेर), भाग्यश्री कोळी (ध.ना.समाजकार्य महाविद्याल, जळगाव), भाग्यश्री महाले (आर.एल.महाविद्यालय,पारोळा), प्रतिमा गावित (सि.गो.पाटील महाविद्यालय, साक्री), हिनल पाटील, दिव्या पाटील,गौरी कापडे (पी.एस.जी.व्ही.पी.एम.एस. महाविद्यालय, शहादा) तर संघ व्यवस्थापक म्हणून डॉ.अमोल भुयार (जी.टी.पी.महाविद्यालय, नंदुरबार) यांचा सहभाग आहे. संघाची निवड झाल्या बद्दल कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर फ.पवार, संचालक, रासेयो डॉ.सचिन ज. नांद्रे यांनी संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी रासेयोचे नंदूरबार जिल्हा समन्वयक डॉ.विजय पाटील, चोपडा विभागीय समन्वयक डॉ.संजय शिगांने, पारोळा विभागीय समन्वयक डॉ.जगदिश सोनवणे, जिल्हा नोडल अधिकारी, शेंदुर्णी डॉ.दिनेश पाटील, सहायक कुलसचिव एन.जी.पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content