Home क्रीडा आंतर विद्यापीठ स्पर्धेत पौर्णिमा द्राक्षे हिला कांस्य पदक

आंतर विद्यापीठ स्पर्धेत पौर्णिमा द्राक्षे हिला कांस्य पदक


paurnima

जळगाव प्रतिनिधी । एस.एस.बी.टी. संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी पौर्णिमा संजय द्राक्षे तिची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव तर्फे मिनीगोल्फ संघात निवड झाली होती. तिने लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जालंधर, पंजाब यांनी आयोजित केलेल्या मिनी गोल्फ या स्पर्धेत एकेरी स्ट्रोक मध्ये कांस्य पदक पटकाविले. सादर विद्यार्थिनीला शा. शी. संचालक प्रा. जे. बी. सिसोदिया यांचे मार्गदर्शन लाभले.

सदर स्पर्धेत कांस्य पदक मिळविलेल्या पौर्णिमा द्राक्षे या विद्यार्थिनीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एस. वाणी, व्यवस्थापन समिती सदस्य प्रा.डॉ.संजय शेखावत,जिमखाना कमिटी चेयरमन प्रा.डॉ.पी.वी. ठाकरे, जन संपर्क अधिकारी प्रा.कृष्णा श्रीवास्तव, शा.शी. संचालक प्रा.जे.बी. सिसोदिया यांनी अभिनंदन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound