जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत बी.टेक. आणि एम. टेक. प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तांत्रिकीच्या रिक्त जागांवर इच्छूक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता बी.टेक. प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तांत्रिकीच्या रिक्त जागांवर इच्छूक विद्यार्थ्यांकडून २७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. तर एम. टेक. प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तांत्रिकीच्या रिक्त जागांवर इच्छूक विद्यार्थ्यांकडून २८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
वरील अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांची माहिती विद्यापीठ संकेतस्थळ www.nmu.ac.in यावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेतील डॉ.पवन डी. मेश्राम (मो.नं.८८०५९७६९६०) व डॉ.तुषार देशपांडे (मो.नं.८९५६१४०९६६) समन्वयक यांचेशी संपर्क साधावा अशी माहिती संचालक प्रा. जे.बी. नाईक यांनी दिली आहे.