युनिटी क्लबचा निसर्ग संवर्धनासाठी बीज संकलन उपक्रम

WhatsApp Image 2019 05 21 at 12.31.11 PM

चाळीसगाव (प्रतिनिधी) वातावरणातील बदल व वाढती उष्णता लक्षात घेता निसर्ग संवर्धनासाठी युनिटी क्लबतर्फे  ‘बीज संवर्धन सप्ताह’ मोहीम अंतर्गत चाळीसगाव शहरात विविध ठिकाणी  बीज संकलन केंद्र व सुरु करण्यात आले असून नगरपरिषदेच्या घंटागाडीद्वारे देखील बियांचे संकलन करण्यात येत आहे.

आंबा,पपई,टरबूज,चिकू, करवंद, जांभूळ, फणस व रानमेव्याचा यांचा हंगाम असून घरी आणलेल्या फळांच्या बिया कचर्‍यात न टाकता एका ठिकाणी संकलित करण्यासाठी ‘बीज संवर्धन सप्ताह’ मोहीम युनिटी क्लबतर्फे हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे बियांचे संकलन करण्यात यावेत असे आवाहन क्लबच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. संकलित झालेल्या बिया तालुक्यालगत असलेल्या परिसरात व राज्य महामार्गावर लावण्यात येणार असून निसर्ग जपण्यासाठी,पुढची पिढी सावलीत वाढण्यासाठी सर्वार्थाने एकत्र आल्यास निसर्ग संवर्धन झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी हा पक्रम राबविण्यात येत असल्याचे सदस्यांनी सांगितले. लक्ष्मीकांत कुलकर्णी,प्रवीण बागड,मनिष मेहता,गितेश कोटस्थाने,हेमंत वाणी,भूपेंद्र शर्मा,गणेश सुर्यवंशी,बाळासाहेब शेंडे,निशांत पाठक,राकेश राखुंडे,विनोद चौधरी,विशाल गोरे,पियुष सोनगिरे,पराग बागड,निरज कोतकर,स्वप्नील धामणे,संजय दायमा,मनिष ब्राह्मणकर,भूषण भामरे,अभय राजपूत,इशू वर्मा,योगेश ब्राह्मणकर,युवराज शिंपी,मिथिलेश पाठक,स्वप्निल कोतकर आदी सदस्यांच्या वतीने मोहीम राबविण्यात येत आहे.

बीज संकलन केंद्र
शहरातील प्रगती कॉर्नर (सिग्नल पॉंईंट), दिपा मेडिकल (करगाव रोड),कमलाकर पान स्टॉल (तहसील कचेरी),आर. के. ट्रेडर्स (घाट रोड),पोलिस वसाहत (बस स्टॅंड) हनुमान मंदीर (नेताजी चौक,रामबाण मेडीकल (आडवा बाजार),हनुमान मंदीर (जहागीरदारवाडी) ड्रीम डीजीटल (मिलगेट),हनुमान मंदीर (हनुमानवाडी) आदी ठिकाणी ‘सीड बॅंक’ उपलब्ध करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content