जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रविवार २० मार्च रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
रविवार २० मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता जळगाव विमानतळावर आगमन येथून जामनेर येथे प्रस्थान, ४:१० वाजता जामनेर व तेथून हिवरखेडा येथे माजी जलसंपदामंत्री तथा आ. गिरीश महाजन यांच्या मुलीच्या विवाह समारंभास उपस्थित राहणार आहेत. तेथून ५:५५ वाजेदरम्यान वाजता जळगाव विमानतळावर आगमन, त्यानंतर लगेचच ६ ते ६:३० वाजे दरम्यान जळगाव विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. तर ६:३० वाजे नंतर विशेष विमानाने नागपूरकडे प्रस्थान असा केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचा जिल्हा दौरा आहे.