वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारताचे जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांचे वरणगाव शहरातील महात्मा फुले सर्कल येथे जंगी ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि पुष्पवृष्टीत भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील व खासदार स्मिता ताई वाघ यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात, वरणगाव रेल्वे स्थानकावर करोना काळापूर्वी थांबणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, भोगावती नदीचे सुशोभीकरण करून त्यात ओझरखेडा धरणाचे पाणी सोडण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. मंजूर पाणीपुरवठा योजनेत तापी नदी पात्रात ज्याक्वेलसह साईनगर, प्रतिभानगर, विकास कॉलनी येथे नव्याने पाण्याच्या टाक्या मंजूर करण्याची मागणी देखील करण्यात आली. पाणीपुरवठा योजनेच्या कामाला जलद गती मिळावी यासाठी केंद्रीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.
या मागण्यांवर प्रतिसाद देताना केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी तातडीने रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून वरणगाव रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे गाड्यांचे थांबे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच, वरणगावच्या पाणीप्रश्नाबाबत राज्य सरकारला लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवीन ज्याक्वेल व पाण्याच्या टाक्यांसंदर्भातही केंद्र सरकार सकारात्मक पद्धतीने निर्णय घेईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. भोगावती नदीचे सुशोभीकरण व ओझरखेडा धरणाच्या पाण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या स्वागत समारंभाला व मागण्यांच्या निवेदन प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे अध्यक्ष सुनील माळी, उपनगराध्यक्ष शेख आखलाक, कामगार नेते मिलिंद मेढे, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, आकाश निमकर, मिलिंद भैसे, हाजी अल्लाउद्दीन शेठ, ऍड. ए. जी. जंजाळे, बळीराम दादा सोनवणे, अरुण इंगळे, नंदू जोशी, अरुण बावणे, सुभाष महाजन, भास्कर गवळी, किरण धुंधे, कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष योगेश माळी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष मयूर शेळके, डॉ. नाना भाऊ चांदणे, कृष्णा महाजन, गोविंदा गावंडे, मुन्ना माळी, मुस्लिम अन्सारी, शेख फजल, जिल्हा सरचिटणीस डॉ. सादिक शेख, कृष्णा सोनगीरकर, संदीप माळी, राहुल जंजाळे, सोनू भंगाळे, संतोष पाटील, संतोष नारखेडे, अनिल काळे, बापू माळी यांसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.