जळगाव प्रतिनिधी। धावत्या रेल्वे खाली ३० ते ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. ह्या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, रेल्वे क्रमांक ११०६० या गोदाम रेल्वे गाडीखाली ३० ते ३५ वर्षीय व्यक्तीने रेल्वे इंजिनसमोर अचानक येऊन आत्महत्या केल्याची घटना भादली-जळगाव दरम्यान असलेल्या खंबा क्रमांक ४२१/१२-१४ दरम्यान घडली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू झाल्याची माहिती कळविण्यात आले आहे. अद्यापपर्यंत मयताची ओळख पटलेली नाही.