जिजामाता माध्यमिक विद्यालयात गणवेश वाटप (व्हिडीओ)

ganvesh vatap 1

जळगाव, प्रतिनिधी | येथील हरिविठ्ठल नगरातील जिजामाता माध्यमिक विद्यालयात आज (दि.१३) कै.गोविंदा भादू खडके, कै. बाबुराव दौलत पवार व कै. चिंधा दौलत धोबी यांच्या स्मरणार्थ महेश गोविंदा खडके, गणेश पवार व संजय चिंधा खैरनार यांच्यातर्फे विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

 

विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र खोरखेडे यांनी गं.भा.नलिनीताई खडके, गणेश पवार व संजय खैरनार यांचे शाल व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयातील किशोर पाटील, श्रीमती लता इखनकर, आशा पाटील, दिनेश सोनवणे, कृष्णा महाले, विकास तायडे, शैलजा चौधरी, संजय पाटील, प्रशांत मडके, जगदीश शिंपी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संगीता पाटील यांनी केले.

 

 

Protected Content