पाण्यात बुडून एकाचा दुदैवी मृत्यू

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीला आले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधा देवबा सोनवणे वय ५५ रा. सामनेर ता.पाचोरा असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील रहिवाशी असलेले बुधा सोनवणे हे गावाजवळच्या तलावात फिरण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी घडली. त्यांना बाहेर काढून पाचोरा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विश्वास देशमुख हे करीत आहे.

Protected Content