धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अनोळखी तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकाजवळील अप रेल्वेलाईनवर भुसावळ सुरत मेमो या धावत्या रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. या संदर्भात जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव रेल्वे स्थानक जवळील रेल्वे खंबा नंबर ३०५ जवळ अपलाइन वरील रेल्वेरूळावर भुसावळ ते उधना मेमो या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोहमार्ग विभागाचे पोलीस कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या घटनेबाबत रेल्वे विभागाचे रेल्वे पोलीस अधिकारी आर.के. पलरेचा यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास लोहमार्ग पोलीस नाईक हिरालाल चौधरी हे करत आहे.

Protected Content