वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रात्रीच्या वेळी लघुशंकेसाठी झोपेतून उठून जात असतांना गच्चीवरून खाली पडल्याने ३० वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे रविवारी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नितीन शांताराम सुरवाडे वय ३० रा. करंजी पाचदेवळी ता. भुसावळ असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथे नितीन सुरवाडे हा तरूण आपल्या आईवडील पत्नीआणि एक मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. रविवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री जेवण करून राहत्या घराच्या गच्चीवर जावून झोपला. रात्री ११ वाजता तो लघुशंकेसाठी खाली उतरत असतांना त्याचा तोल गेल्यानंतर गच्चीवरून थेट खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी खासगी वाहनाने तातडीने वरणगाव पोलीस ठाण्यात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. नितीनच्या मृत्यूची वार्ता कळताचा नातेवाईकांनी ग्रामीण रूग्णालयाच हंबरडा फोडल्याचे पहायला मिळाले. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.