धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा तोल जावून विहीरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी १५ जुलै रोजी दुपारी घडली. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुनम राहूल पाटील (वय-२८) रा. मराठे गल्ली, धरणगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, धरणगाव शहरातील मराठे गल्लीत पुनम पाटील या विवाहिता पती व नातेवाईकांसोबत वास्तव्याला होत्या. शनिवारी १५ जुलै रोजी शेतात पिकांना खत देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पती राहूल पाटील, मामे भाऊ अतुल पाटील आणि इतर नातेवाईक होते. दुपारी शेताच्या शेजारी पांडूरंग पाटील यांच्या शेतात विहिरीचे पाणी घेण्यासाठी विवाहिता पुनम पाटील ह्या गेल्या होत्या. त्यावेळी त्याचा तोल गेल्या त्या विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. बाराच वेळ झाल्याने पुमन परत आल्या नाही म्हणून पती व नातेवाईकांनी शोध घेतला असता त्या विहिरीत पडलेल्या दिसून आल्या. नातेवाईकांनी विहीरीतून बाहेर काढल्यानंतर तातडीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या घटनेबाबत पती राहूल पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.