जळगाव (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गोलाणी मार्केट येथे आज अनधिकृत बॅनर काढून टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे १५० ते २०० बॅनर व होर्डिंग्ज काढण्यात आले.
गोलाणी मार्केटमधील दुकानदारांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी अनधिकृत होर्डिंग काढले नव्हते. त्यामुळे आज महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने व किरकोळ वसुली पथकाने ही कारवाई केली. यावेळी अतिक्रमण विभागाचे अधीक्षक खान व वसुली पथकाचे नरेंद्र चौधरी हे अधिकारी उपस्थित होते.