जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पंजाबराव उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दत्तात्रय शिंदे हे गत ऑगस्ट महिन्यात जळगाव येथे रूजू झाले होते. मात्र अवघ्या सहा महिन्यांमध्येच त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी सध्या अँटी करप्शन ब्युरोत कार्यरत असणारे पंजाबराव उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जळगाव येथील दौर्यात केलेले चित्रीकरणाचे प्रकरण भोवल्याचे मानले जात आहे. त्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने रात्री उशीरा काढले आहेत.

गृह विभागाने राज्यातील १० अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुण्यातील तेजस्वी सातपुते यांची सातारा येथे पोलीस अधीक्षक,पी. व्ही. उगले (एसीबी नाशिक ते पोलीस अधीक्षक जळगांव), विनिता साहू (पोलीस अधीक्षक, भंडारा ते पोलीस अधीक्षक, गोंदिया), हरिष बैजल (पोलीस अधीक्षक, गोंदिया ते समदेशक, गट क्रमांक ६, धुळे), अरविंद साळवे (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई ते पोलीस अधीक्षक, भंडारा), जयंत मीना (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण), पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, सातारा ते, पोलीस उपायुक्त, पुणे शहर), तेजस्वी सातपुते (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, सातारा), दत्ता शिंदे (पोलीस अधीक्षक, जळगांव ते (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई), इशू सिंधू (निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली ते पोलीस पोलीस अधीक्षक, अहमदनगर) आणि रंजनकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक, अहमदनगर ते पोलीस अधीक्षक, नागपूर)येथे नियुक्ती करण्यात आली आहे.


