Home करियर दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक; जिल्हापेठ पोलीसांची कारवाई !

दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक; जिल्हापेठ पोलीसांची कारवाई !

0
104

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बस स्थानक परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा जिल्हापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मालेगाव येथील तीन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून काही दिवसांपूर्वी एक दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक आणि अबुबकर नईम कौसर (सर्व राहणार मालेगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी नाशिक येथून एक टीव्हीएस रायडर (MH १५ JF ३६०९) चोरी केली होती. याच गाडीवर बसून ते जळगावात आले, तिथे ती गाडी एकाला विकली आणि त्यानंतर नवीन बस स्थानकातून हिरो होंडा स्प्लेंडर (MH १९ BS १५७३) चोरून मालेगावला पळून गेले.

पोलीस पथकाची कामगिरी:
जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकातील पीएसआय शांताराम देशमुख, संतोष सोनवणे, महेश महाजन व इतर कर्मचाऱ्यांनी ही महत्त्वाची कामगिरी केली.


Protected Content

Play sound