जळगाव (प्रतिनिधी) शहरातील उद्योगिनी या दालनाद्वारे महिलांना गृह उद्योगासाठी प्रेरित करण्याचे महत्वाचे कार्य करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सध्या १० बचत गट या दालनाशी जुळलेले आहेत. त्यातील महिलांनी बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू व पदार्थांना येथे एकाच छताखाली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या येथे अक्षय्य तृतीयेनिमित्त खापरावरची पुरणपोळी विशेष मेनू म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी फक्त ‘उद्योगिनी’ च्या भास्कर मार्केटमधील दालनाकडे एक दिवस आधी आपली ऑर्डर नोंदवणे गरजेचे आहे.
‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ च्या प्रतिनिधीने या दालनाच्या संचालिका हर्षा भट यांच्याशी यासंदर्भात बातचीत केली असता त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली. बचत गट व अन्य महिला उद्योजकांना स्वयं रोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी ‘उद्योगिनी’ च्या १३ जिल्ह्यांमध्ये शाखा सुरु झाल्या आहेत. दरमहा त्यांच्या माध्यमातून महिलांचा मेळावा घेतला जातो. ज्या महिला स्वत:चा व्यवसाय सुरु करून रोजगार मिळवू इच्छितात त्यांनी या दालनाशी नक्की संपर्क साधावा, असे आवाहन संचालिका हर्षा भट यांनी केले आहे.
पहा : हर्षा भट यांनी दिलेली माहिती.