मुंबई । देवेंद्रंचे नाव पाटील, जाधव असतं तर कुणी बोललं नसत असे प्रतिपादन करत विरोधी पक्षनेते फडवीस यांनी केलेल्या जातीच्या उल्लेखाला उदयनराजे भोसले यांनी समर्थन दिले आहे.
कालच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपण ब्राह्मण असल्याने टार्गेट केले जात असल्याचा आरोप केला होता. यावर आज छत्रपती खासदार उदयन राजे भोसले यांनी भाष्य केले आहे.
ब्राह्मण असल्याने फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत असा आरोप केला जातोय यावर तुम्ही काय सांगाल असा प्रश्न उदयनराजे यांना आज विचारण्यात आला. याला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, देवेंद्र माझा खास मित्र असून या प्रकरणाचा जातीशी काही संबंध नाही. मुख्यमंत्री, पंतप्रधान यासाठी पद असतात. लोकांनी निवडून दिलं तर तुम्ही त्या पदावर बसता. आज देवेंद्र माझा खास मित्र आहे. त्याचं बिचार्याचं काय चुकलं? त्याचं काय चुकलं तुम्हीच मला सांगा?, असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना त्यांनी, त्याचं नाव पाटील, जाधव असतं तर कुणीच काही बोललं नसतं. या प्रकरणामध्ये ब्राम्हणचा संबंधच काय आहे. उगीच आपलं काहीतरी. जाता जाता जात नाही ना त्याला जात म्हणतात, असे ते म्हणाले. तर आपण लोकशाहीमध्ये राहतो तरी लोकं जात पाहून मतदान करत असल्याने चांगले लोकं पदापासून लांब राहतात असेही उदयन राजे म्हणाले.