ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह

 

कोल्हापूर- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी दुपारी पॉझिटिव्ह आला. आपल्या संपर्कातील आलेल्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, शक्य असल्यास तपासणी करावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.

गुरूवारी संध्याकाळी ते मुंबईतून मंत्रालयातील कामकाज आटोपून कोल्हपूरला रवाना झाले. काल अंगात ताप आणि कणकण असल्याने मुश्रीफ यांनी शुक्रवारी सकाळी स्वॅब तपासणी केली. दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समजले. यानंतर सायंकाळी त्यांनी एचआरसिटी स्कॅन करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरी किंवा दवाखान्यातच थांबणार आहेत. पुढील काही दिवस कोणालाही भेटणार नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

Protected Content