उद्या भारत बंदचे आयोजन 

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चाद्वारे भारत बंदचे उद्या आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विकास पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय संयोजक बहुजन क्रांती मोर्चा वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली 25 मे रोजी राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चा द्वारे भारत बंदचे आंदोलन छेडण्यात आलेले आहे.

या आंदोलनाचे दहा प्रमुख मुद्दे केंद्र सरकार द्वारे ओबीसींची जाती आधारित जनगणना न करण्याच्या विरोधात ईव्हीएम घोटाळाच्या विरोधात खाजगी क्षेत्रात ओबीसी एससी एसटी प्र वर्गांना प्रतिनिधित्व लागू करा, शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावा येणार, सी.एन.पी.आर सी.ए.ए च्या विरोधात जुनी पेन्शन स्कीम लागू करा, पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी पर्यावरण संरक्षणाच्या नावावर आदिवासींचे विस्थापन करण्याच्या विरोधात जबरदस्तीने व्हॅक्सिनेशन देण्याच्या विरोधात, लॉक डाऊनच्या काळात गुप्तपणे कामगारांच्या विरोधात, कामगार कायद्याच्या विरोधात अशा एकूण दहा मुद्द्यांवर भारत बंद आंदोलन होणार आहे.

या आंदोलनाला मुक्ताईनगर जळगाव जिल्हातील बहुजन मुक्ती पार्टीने सुद्धा जाहीर समर्थन दिलेले आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवि पवार तसेच बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे, भारत मुक्ती मोर्चा तसेच संघटनेचे पूर्णकालीन प्रचारक नितीन गाढे यांनी सुद्धा आंदोलनाला समर्थन दिले आहे.

Protected Content