जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भोकर येथे मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन तरूणांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ११ नोव्हेंबर रात्री साडेबारा वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अलोक भास्कर कोळी (वय-२१) रा. कोळीवाडा ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अलोक कोळी हा त्याचा मित्र दिपक सोबत घराच्या ओट्यावर बसलेले होते. त्यावेळी गावातील विजय सोनवणे याला सकाळी मारहाण केल्याचा जाब अलोक कोळी याने विचारला. याचा राग आल्याने गावातील विजय पंडीत सोनवणे, राम पंडीत सोनवणे, मोनिका विजय सोनवणे व संजय पंडीत सोनवणे सर्व रा. भोकर ता.जि.जळगाव यांनी लाठ्याकाठ्या आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच दोघांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर अलोक कोळी आणि दीपक यांनी जळगाव तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी विजय पंडीत सोनवणे, राम पंडीत सोनवणे, मोनिका विजय सोनवणे व संजय पंडीत सोनवणे या चौघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण आगोणे करीत आहे.