दारू सोडण्याचे औषध घेतल्याने दोन तरूणांचा मृत्यू

चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चंद्रापूर जिल्हयात भद्रावती तालुक्यातील दोन युवकांचा दारू सोडण्याचे औषध घेतल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हेच औषध घेतलेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे, प्रतीक घनश्याम दडमल अशी मृतकांची नावे आहेत. सदाशिव पुंजाराम जीवतोडे व सोमेश्वर उद्धव वाकडे (वय 35) या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी महाराजाला ताब्यात घेतले आहे.

सहयोग सदाशिव जीवतोडे व प्रतीक घनश्याम दडमल हे गुळगावमधील दोन तरुण वर्धा जिल्ह्यातील शेडगावमध्ये दारू सोडवण्याचा दावा करणाऱ्या महाराजांकडे गेले होते. त्यांनी २१ मे रोजी औषध घेतले होते. दारु सोडवण्यासाठी दिलेलं औषध प्राशन केल्यानंतर काल रात्री उशिरा त्या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा भद्रावती पोलिस तपास करत आहेत.

Protected Content