बिबट्याच्या दोन बछड्यांना वाहनाने चिरडले

panther

 

नाशिक (वृत्तसंस्था) सिन्नर तालुक्यातील डुबेरे सोनारी रस्त्यावर बिबट्याच्या दोन बछड्यांना अज्ञात वाहनाने चिरडले. या दुर्दैवी अपघातात दोघा बछड्यांचा जागी मृत्यू  झाल्याची घटना आज सकाळी  उघडकीस आली.

सिन्नर तालुक्यातील डुबेरे-सोनारी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन बिबट्याची मादी आणि तिचे तीन बछडे रात्री जात होते. त्यावेळी रस्त्यावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या सहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा मृत्यू झाला. मादी आणि तिचा एक बछडा या अपघातातून बचावला. मात्र, अपघाताच्या भितीने मादी आणि वाचलेला बछडा त्याच परिसरात दडून बसल्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.

Protected Content