पुणे (वृत्तसंस्था) पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या एका अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला आहे. उपचारा दरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे स्टेशन बाहेरील फुटपाथवर आई-वडीलांसोबत ही अडीच वर्षाची चिमुरडी राहत होती. मंगळवारी सकाळी या अडीच वर्षाच्या मुलीला झोपेतून उचलून रेल्वेच्या बोगीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांना रेल्वेच्या बोगीत बेशुद्ध अवस्थेत ही मुलगी आढळून आली. त्यावेळी तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.