जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अजिंठा चौफुली जवळून बसमधून प्रवास करत असतांना दोन महिलांच्या पर्समधून ६ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना २१ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, किरण योगेश बोरसे वय ३४ या महिला आपल्या कुटुंबासह भुसावळ येथे वास्तव्याला आहे. रविवारी २१ एप्रिल रोजी दुपारी महिला व त्यांची नणंद मनिषाबाई सहावे यांच्यासोबत भुसावळ येथून बस क्रमांक (एमएच २० बीएल ३५५३) मधून प्रवास करत होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने दोनही महिलांच्या पर्समधून ६ लाख ३० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले अहे. जळगाव शहरातील अजिंठा चौकातून प्रवास करत असतांना दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. हा प्रकार घडल्यानंतर अखेर बुधवारी २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.