बंद घर फोडून चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोन महिला पोलीसांच्या ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अल्पवयीन मुलाने त्याच्या संपर्कात असलेल्या दोन महिलांच्या मदतीने वर्षा आगे यांच्या घरात डल्ला मारुन चार लाखांचे सोने लांबविले होते. रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने अवघ्या २४ तासात या गुन्ह्याचा छडा लावित अल्पवयीन मुलासह संशयित अश्र्विनी संतोष सोनार (विसपुते) (रा. वाघनगर) व जयश्री नागराज पाटील (रा. देवेंद्र नगर) या दोघांना अटक केली. त्यांनी हे सोने अमळनेर येथील सराफा व्यावसायिकाला विले असून त्याच्याकडून ७ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

 

शहरातील संभाजी नगरातील वर्षा आगे या महिला गावाला गेल्यानंतर जाणार असल्याची माहिती अल्पवयीन मुलाला समजले. त्यांच्या घरात सोने असल्याने त्याने त्याच्या संपर्कात असलेल्या अश्विनी सोनार व जयश्री पाटील यांच्यासोबत चोरीचा प्लॅन तयार केला. आगे या गावाला गेल्यानंतर संशयितांनी त्यांच्या घरात प्रवेश करुन कपाट ठेवलेले ४ लाखांचे दागिने चोरुन नेले. गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने तपासात संशयित चोरटा अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला ताब्यात घेतले.

अमळनेर सराफाकडून जप्त केले ७ तोळे सोने

संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर पथकाने त्याची चौकशी केली. यावेळी अल्पवयीन मुलाने ही चोरी त्याने अश्विनी सोनार व जयश्री पाटील यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेत कसून चौकशी करताच त्यांनी चोरलेले सोने हे अमळनेर येथील सराफाला विकल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ७ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

या पथकाची कामगिरी

ही कामगिरी रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सपकाळे, पोहेकॉ सुशील चौधरी, पोहेकॉ विजय खैरे, पोना राजेश चव्हाण, रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, पोकॉ रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, मपोकॉ अर्चना घुमावत यांच्या पथकाने केली.

Protected Content