जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातून पाचोरा, चाळीसगाव तसेच पारोळा व बोदवड या तालुक्यामधून दुचाकी चोरणाऱ्या सराईत तसेच रेकार्डवरील दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने बुधवार, १९ जुलै रोजी अटक केली आहे. संदीप अर्जून गुजर रा. शेंदुर्णी ता जामनेर असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक गणेश चोभे, पोलीस हवालदार विजयसिंग पाटील, सुधारक अंभोरे, अक्रम शेख, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, विजय पाटील, रणजीत जाधव, सचिन महाजन, प्रितम पाटील, अशोक पाटील, गोरख बागुल, हेमंत पाटील यांच्या पथकाने संशयित तसेच सराईत दुचाकी चोरटा संदीप गुजर यास अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. हस्तगत दुचाकींबाबत चाळीसगाव, पारोळा, पाचोरा, बोदवड या ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून पाचोरा येथील गुन्ह्यात त्याला पाचोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.