खळबळजनक : मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने पित्याने घेतली धरणात उडी !

जमीन व्यवहारात सख्ख्या मावसाने दिला धोका, परिसरात हळहळ व्यक्त !

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मावसाने पैसे घेवून जमीन नावावर केली नाही, तर दुसरीकडे इकडे मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नाही. “इकडे आड तिकडे विहिर” अशी परिस्थित असलेल्या पित्याने सततच्या त्रासाला कंटाळून धरणात उडी घेवून आपली जीवन यात्रा संपविल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एकावर पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष सुरेश मराठे (वय-४७) रा. शेंदुर्णी ता.जामनेर असे मयताचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात संतोष मराठे आणि त्यांचे भाऊ पंकज मराठे यांचे कुटुंबिय वास्तव्याला आहे. संतोष मराठे यांचे मावसा वसंत रावण बागुल रा. खेडी बुद्रुक ता.जि.जळगाव यांच प्लॉट (जमिन) यांची जमीने पैसे देवून घेतली होती. पैसे दिल्यानंतर जमीन संतोष मराठे यांच्या वडीलांच्या नावावर केली नाही. दुसरीकडे संतोष मराठे यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे लागत होते. त्यासाठी त्यांनी जमीन विक्री करायची होती. परंतू ही जमीन नावावर करून देण्यासाठी त्यांचा मावसा वसंत बागुल हा टाळाटाळ करीत होता. त्यामुळे त्यांनी या त्रासाला कंटाळून १४ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता शेंदुर्णी शिवारातील गोंदेगाव धरणात उडी घेवून आत्महत्या केली. हा प्रकार घडल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. दरम्यान, मयत संतोष मराठे यांचे लहान भाऊ पंकज मराठे यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी वसंत रावण बागुल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Protected Content