भुसावळ प्रतिनिधी । खामगाव व कल्याण येथून दोन दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन चोरट्यास शहरातील मुस्लिम कॉलनीतून एलसीबीने अटक केली. त्याच्या ताब्यातील दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७० हजार रूपये किमतीची तर खडकपाडा कल्याण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८० हजार रूपये किमतीची अशा १ लाख ५० हजार रूपये किमतीच्या दोन काळ्या व लाल रंगाच्या पल्सर गाड्या चोरून नेल्याचे दोन गुन्हे दाखल होते ते आता उघडकीस आले. दोन्ही गुन्ह्यातील आरोपी हा भुसावळात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसान पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अशोक महाजन, पोहेकॉ शरीफोद्दीन काझी, सुरज पाटील, पोना. युनूस शेख, पो.ना.किशोर राठोड, पो.ना. अरूण राजपूर, पोकॉ रणजीत जाधव यांनी कारवाई करत अल्पवयीन आरोपीस शहरातील मुस्लिम कॉलनीतून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले असून पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.