बुद्रुक येथून दुचाकी लंपास ; अज्ञाताविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील पाटीलवाडा मराठी शाळेजवळून एकाची 12 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रमोद रवींद्र पाटील वय 32 रा. पाटील वाडा मराठी शाळेच्याजवळ खेडी बुद्रुक ता.जि. जळगाव हे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. 18 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 20 जानेवारी रोजी सकाळी 6 दरम्यान त्यांनी त्यांच्या घरासमोर त्यांची (एमएच 19 एएल 1125) क्रमांकाची दुचाकी पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 12 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी प्रमोद पाटील यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांनी विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार 21 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार आनंद सिंग पाटील करीत आहे.

 

Protected Content