जळगाव प्रतिनिधी । शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाल समोरुन पायी चालत असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यास दुचाकीने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
संतोष लक्ष्मण कसोटे (वय-३०) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. कसोटे हे पायी चालत असताना (एमएच १९ बीई ०५६०) क्रमांकाच्या दुचाकीवरील चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात कसोटे हे गंभीर जखमी झाले. सहकारी कर्मचाऱ्यांची त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.