जळगाव प्रतिनिधी । दुचाकीचा धक्का लागल्याने महिला होमगार्डने शिवीगाळ करून तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना आज तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत माहिती अशी की, गणेश ज्ञानदेव पाटील आणि चेतन ज्ञानदेव पाटील दोन्ही रा. आसोदा ता.जि.जळगाव हे मोबाईल घेण्यासाठी जळगावला दुचाकी क्रमांक (एमएच 19 5970) ने दुपारी 3 वाजता आले. गोलाणी मार्केटजवळ आल्यानंतर अदित्य साडी सेल जवळ दुचाकी पार्क करत असतांना मागुन स्कुटी क्रमांक (एमएच 19 एबी 5212) महिला आपल्या आईसोबत येत असतांना गणेशच्या गाडीला धक्का दिला. यात महिलेची आई गाडी खाली पडल्या. यावर महिलेने व तिच्या आईने दोघा तरूणांना शिवीगाळ केली व गणेशच्या कानशिलात लगावली. या घटनेमुळे गोलाणी मार्केटमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. दरम्यान दोन्ही तरूणांनी महिलांची माफी देखील मागितली होती मात्र सदरील महिला होमगार्ड असल्याची बातवणी करत बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.