मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकाच रूळावर दोन ट्रेन्स आल्यामुळे मुंबईत अपघात घडला आहे.

या संदर्भात मिळालेले माहिती अशी की, दादर ते माटुंगा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान दोन एक्स्प्रेस समोरासमोर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये गदग एक्स्प्रेसच्या इंजिननं प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला धडक दिल्यानं हा प्रकार घडला. या अपघातामुळे जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
रात्री पावणेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसच्या इंजिननं माटुंगा रेल्वे स्थानकात पॉंडिचेरी एक्स्प्रेसला मागच्या बाजूने धडक दिली. दोन ट्रॅक एकमेकांना क्रॉस करत असल्याच्या ठिकाणी ही धडक झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पॉंडिचेरी एक्स्प्रेसचे मागच्या बाजूचे ३ डबे रुळावरून घसरल्याची माहिती देण्यात आली आहे.