Home क्राईम पाचोरा बसस्थानकातून पाकिटातून दोन हजारांची चोरी

पाचोरा बसस्थानकातून पाकिटातून दोन हजारांची चोरी


WhatsApp Image 2019 03 10 at 5.28.51 PM

पाचोरा (प्रतिनिधी)। पाचोरा शहरात आज लग्नसमारंभाचा मोठ्या प्रमाणात तारीख असल्याने लग्नाला येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या रेल्वे स्टेशन व बसस्थानक मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीचा पुरेपूर फायदा चोरट्यांनी घेतला असून चोरट्यांनी एका महिलांचा पारोळा पाचोरा बस क्रमांक (एमएच २० बीएल ०९२७) बसमध्ये प्रवास करीत असताना प्रवासातच एका चोरट्यांनी डल्ला मारण्याची घटना घडली आहे. ही घटना सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास घडली.

पारोळा ते पाचोरा प्रवास करीत असताना चोरट्यांनी महिलेचे दोन हजार रुपये रकमेचे पाकीट चोरी केली. एक अनोळखी वृध्द महिला आणि एक तरूणी बस मधून प्रवास करीत असतांना बसमध्ये अज्ञात चोरट्यांने दोन हजार रूपये पाकीटातून काढल्याची घटना घडली. मात्र याबाबत बसमध्ये चौकशी केली असता कोणीही मिळून आले नाही. दोन्ही महिलांसोबत कोणीह पुरूष नसल्याने त्यांनी पोलीसांना तक्रार देणेही टाळले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound