चाळीसगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ठाणे व कल्याण येथून चोरी केलेल्या दोन दुचाकी हे चाळीसगाव शहरातील बाजार मार्केट कमिटी परिसरात विक्रीसाठी आणलेल्या दोन संशयित आरोपींना शनिवारी ८ जून रोजी रात्री ९.३० वाजता चाळीसगाव शहर पोलीसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलीसांच्या वतीने शहरात पेट्रोलिंग करत असतांना चाळीसगाव राबविण्यात आली. त्यावेळी बेलखेडा ता. कन्नड येथील दोनजण हे चोरीच्या दोन दुचाकी बाजार मार्केट कमिटी परीसरात विक्री करीता येणार असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. त्याानुसार पथकाने शनिवारी ८ जून रोजी रात्री ९.३० वाजता कारवाई केली. त्यावेळी पोलीसांनी दोन संशयितांना चोरीच्या दोन दुचाकीसह अटक केली. बापुजी उर्फ लखन बळीराम राठोड वय-३५ आणि विवेक गणु आडे वय-३३ दोन्ही रा. बेलखेडा ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दोघांवर चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.