जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहराजवळ असलेल्या नशिराबाद-जळगाव मार्गावर तरसोद फाटाजवळ असलेल्या सरस्वती फोर्ड नावाचे कार शोरूम आहे. या कार शोरूमच्या परिसरात लोखंडी सामान चोरीला गेला होता. त्यावरून सरस्वती फोर्ड शोरूमचे मालक दिलीप एकनाथ बेंडाळे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या शोरूम परिसरात सध्या नवीन शोरूमचे काम सुरू आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, सदर परिसरातून ४२ हजार रूपये किंमतीचा लोखंडी गर्डर, आसारी व इतर लोखंडी सामान चोरी झाला होता. त्यानंतर नशिराबाद पोलिस स्टेशनचे एपीआय आसाराम मनोरे यांच्या पथकातील अंमलदार पोहेकॉ युनूस शेख, शिवदास चौधरी, गिरीश शिंदे, भरत बावीस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, समीर सय्यद यांनी गुप्त बातमीच्या आधारे संशयित आरोपी सलीम शेख कय्युम व मोहसीन बेग हसन बेग यांना ताब्यात घेतले. त्या दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ गिरीश शिंदे करीत आहेत.